तेजस्वी सूर्य

कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात जर कोणी असेल तर तो म्हणजे एकमेव शरद पवार!

जाणता लोकनेता

भारताच्या राजकीय क्षेत्रातील कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार.

अष्टपैलू व्यक्तिमत्व

शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार!

मुद्रा पवार साहेबांची

शरद पवार साहेब

जाणता लोकनेता

भारताच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार.

सामान्यांना आपलेसे करणे ही मोठी कठीण गोष्ट असते. शरद पवारांना ती लिलया जमते; कारण ते जनसामान्यांच्या प्रश्नसमस्यांना मनापासून भिडतात. लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात गढून गेलेले शरद पवार त्यांच्या हरएक कृतीकार्यातून बघायला मिळतात. असाच नेता लोकांना ‘आपला’ वाटतो. कारण या नेत्याच्या शब्दांत पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते. कारण स्वत: शरद पवारांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते.

अधिक वाचा….

मर्मज्ञ रसिक

शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेजाणता लोकनेताद्रष्टासंकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे.याशिवाय महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्यसंस्कृतीसंगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार!

कोणत्याही गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते, अभ्यासाची ओढ लावते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार! अभ्यास-सायास-प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडवीत असतात. शरद पवारांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वात हे सारे कंगोरे आढळून येतात.

अधिक वाचा…

संवेदनशील लोकनेता

राजकारणाच्या धकाधकीत मनाची सर्जनशीलता जपलेला एक संवेदनशील लोकनेता म्हणजे शरद पवार!

मानवी जगण्याशी संबंधित काही काही क्षेत्रे अशी असतात की तिथल्या रखरखाटामुळे माणसाची संवेदनशीलता, भावुकता, अलवारता करपून जावी. उदा. वैद्यकीय क्षेत्र, पोलिस खाते, लष्कर…. तसेच राजकारण!

अधिक वाचा…

एकमेव महानेता

कुशाग्र बुध्दिमत्तातीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात कोणी असेल तर तो म्हणजे शरद पवार!

खेळांवरील प्रेम

शरद पवारांचे खेळावरील प्रेम व खेळाडूंविषयी वाटणारी आत्मीयता तर सर्वश्रुतच आहेत्यांच्या संघटनकौशल्याचा लाभ भारतीय क्रीडाक्षेत्राला गेली अनेक वर्षे होत आहे.

सुरुवातीपासून खेळाच्या संघटनांना पाठिंबा देऊन संघटनात्मक पातळीवरती मजबुती आणून त्याचा खेळाडूंना कसा फायदा होईल यासाठी शरद पवारांनी अथक प्रयत्न केले. विविध खेळांच्या राज्य व राष्ट्रीय पातळींवरील संघटनांमध्ये मानाची व महत्त्वाची पदे भूषविली आहेत. विशेषत: कबड्डीचा आज जो विकास झाला आहे त्या पाठीमागे शासकीय आधार मिळवून दिला तो महत्त्वाचा आहे. खेळाडूंना योग्य तो फायदा मिळवून देण्यासाठी नियम व कायदे बनविणे हे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.

अधिक वाचा…

एका विशीष्ट पक्षाचे अध्यक्ष असून देखील शरद पवार साहेब हे सर्वच पक्षातील दिग्गजांचे गुरु राहिले आहेत, हे सर्वश्रुत आहे. अशाच काही मान्यवरांची मतं इथे वाचायला मिळतील.

संचालक - विशाल दुराफे

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त “लोकनेटवर्क” मीडिया हब संचलित
“शरदपवार डॉट कॉम” या वेबसाईट वर “पॉवरफुल नेता” यांसोबातच्या आठवणी”
हा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रम अंतर्गत सर्वांना “लोकनेटवर्क” मीडिया तर्फे साहेबांची छोटी भेट आपल्यापर्यंत आपल्या पत्त्यावर पोहोचविली जाईल.

~ ~ ~ अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. ~ ~ ~

स्व. श्री. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा

राष्ट्रवादी विचारांचा तेजोमय सूर्य

भारतीय राजकारण व समाजकारणातील एक सर्वमान्य जाणता लोकनेता!
शेती, शिक्षण, व्यापार, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सदैव देशातील सर्वसामान्य माणसाच्या
हिताची तळमळ बाळगणार्‍या या समर्थ नेतृत्वाच्या वाटचालीचा मागोवा घेत त्याच्या विचारांतून सामान्य कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या
विकासाची आस बाळगणार्‍या जागरुक नागरिकांपर्यंत प्रत्येकाला प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी.