डॉ. स्वामीनाथन

डॉ. स्वामीनाथन

“हा तुमचा मुलगा मला (म्हणजे महाराष्ट्राला) द्या” असे म्हणून मा.यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या मातेकडून शरदरावांना मागून घेतले आणि यशवंतरावांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत शरद पवारांची राजकीय घोडदौड सुरू झाली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्री पदापर्यंत झेप घेत आजही सुरूच आहे.

पाझर तलावांच्या माध्यमातून पवारसाहेबांनी केलेल्या जलसंधारण क्षेत्रातील यशस्वी प्रयोगाचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी आकाशवाणीवरून जाहीरपणे कौतुक केले.

आज राज्याचे शेती खात्याचे मंत्री म्हणून काम करताना हॉर्टिकल्चर बाबत पवारांनी राबविलेल्या धोरणाचे कौतुक करताना प्रसिध्द संशोधक डॉ. स्वामीनाथन यांनी

‘‘हॉर्टिकल्चर क्रांतीचे जनक म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल’’, असे गौरवोद्गार काढले.